- कापूस
- गहू
- बाजरी
- मका
- भात
- भाजीपाला
- फळे
- रोपवाटिका
- Home
- आमची उत्पादने
- बायोफर्टिलायझर्स
- जी ॲग्रो ॲझो
जी ॲग्रो ॲझो
Category: बायोफर्टिलायझर्स
- Description
Description
Description
हे जिवाणू वनस्पतींबरोबर असहजीवी पद्धतीने जमिनी मध्ये मुळांच्याभोवती स्वतंत्ररित्या राहून हवेतील नंतर पिकांना उपलब्ध करून देतात. सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनी मध्ये अझोटोबॅक्टर चे कार्य चांगले चालते . कारण सेंद्रिय पदार्थाच्या विघटनातून निर्माण होणाऱ्या उर्जेवर हे जिवाणू जगतात.
- मातीची पोत सुधारते.
- बियांची उगवण क्षमता वाढते.
- रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
- मुळांची आणि अंकुराची लांबी वाढते.
- नैसर्गिकरित्या मातीचे आरोग्य राखून ठेवते.
- उत्पन्न १०-१५ टक्के वाढते.
- माती प्रकिया : ॲझोटोबॅक्टर थेट जमिनीत पसरत नाही. प्रथम २ लीटर एझोटोबॅक्टर स्प्रे ५० किलो शेणखतामध्ये किंवा कंपोस्टमध्ये स्प्रे करावे नंतर मातीवर झाडांच्या बुडाशी टाकावे.
- बीज प्रकिया : २५ मि.ली. एझोटोबॅक्टर १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे .१ लिटर द्रावण १ एकरासाठी लागणाऱ्या बियाणांवर हळूहळू चोळावे . नंतर बियाणे सावलीत पसरवून १५-२० मिनिटे ठेवावे व नंतर लगेच पेरणी करावी.
- रोपांवर प्रकिया : ५० लिटर पाण्यात १ लिटर ॲग्रो अझो मिक्स करावे. प्रत्यारोपण करण्यापूर्वी १५-२० मिनिटे रोपांच्या मुळांना बुडवून मग लावा.
- थंड आणि कोरड्या जागेत ठेवा.
- उष्णता आणि सूर्यप्रकाशापासून संरक्षण करा.
- जी ॲग्रो ॲझो एक जिवंत जीवाणू आहे, ॲझोटोबॅक्टर लागू करण्यापूर्वी किंवा नंतर रासायनिक खते / कीटकनाशके / जीवाणूनाशक यांच्यापासून दूर ठेवा .
- नायट्रोजन फिक्सेशन
- ॲझोटोबॅक्टरला कार्बन स्रोत अन्न म्हणून आवश्यक आहे.
- जर आपण थेट ॲझोटोबॅक्टरला जमिनीत पसरवले तर माती ॲझोटोबॅक्टरला कार्बन स्रोत पुरवत नाही आणि अझोटोबॅक्टर जिवंत राहत नाही म्हणून शेणखत / कंपोस्ट / गांडूळखतामध्ये ॲझोटोबॅक्टर मिक्स करा आणि नंतर ॲझोटोबॅक्टर त्यांच्यामधून कार्बन स्त्रोत शोषून घेतो आणि नंतर मातीमध्ये पसरावे.
- जी ॲग्रो ॲझो देखील IAA , गिब्रेरेलिक ऍसिड, सायटोकिनिन, व्हिटॅमिन इत्यादीसारख्या वाढीच्या पदार्थांची निर्मिती करतात.
- सीएफयू गणना : १ x १०९
- पीएच : ५ ते ७.५